रत्नागिरी | प्रतिनिधी : सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम असताना रत्नागिरी शहरात वृद्ध वॉचमनचा डोक्यात चिरा घालून खून झाल्याचे उघड झाले असून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
रत्नागिरी शहरातील गवळीवाडा कडे जाणाऱ्या रस्त्याजवळ जुन्या रेगे कंपाऊंडमध्ये ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अशोक वाडेकर असे या प्रौढाचे नाव असल्याचे समजते. मृत व्यक्ती ही कंपाउंड समोरील इमारतीमध्ये वॉचमन म्हणून कामाला होती. या इमारती नजीक ते वास्तव्याला होते. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र याबाबत रत्नागिरी शहर पोलीस तत्काळ कामाला लागले असल्याची माहिती पुढे येत आहे












