नारायण राणे अडीज लाखाच्या मताधिक्कयाने निवडून येणार: प्रमोद जठार

राजापूर (प्रतिनिधी): देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षामध्ये केलेला विकास, नारायण राणे यांनी सिंधुदूर्गच्या व कोकणच्या विकासाठी दिलेले मोलाचे योगदान आणि महायुतीची भक्कम साथ, महायुतीकडे असलेले चार आमदार यामुळे नारायण राणे ख्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघातून अडीज लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास लोकसभा क्षेत्राक्षचे प्रभारी व माजी आमदार प्रमोद जठार यांनी बोलताना व्यक्त केला.

पाचल येथील महायुतीच्या निवडणुक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना व्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर जोदार टीका केली. गेल्या दहा वर्षात राऊत यांनी मतदार संघात कोणतेच काम केलेले नाही. आम्ही आणलेल्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याचे काम केले. त्यामुळे अशा निष्क्रीय खासदारालाघरी बसविण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

यावेळी व्यासपीठावर प्रसिध्द उदयोगपती मनोहर खापणे, राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव, विधानसभा क्षेत्र प्रमुख सौ. उल्का विश्वासराव, जिल्हा सरचिटणी चंद्रकांत लिंगायत, तालुका अध्यक्ष पुर्वभाग भास्कर सुतार, तालुका सरचिटणीस प्रदिप गांधी, तालुका महिला उपाधक्षा चैताली साळवी, वैशाली साळवी, समीर खानविलकर, काशिनाथ पाटील, शिक्सेना शिंदे गटाचे पाचल विभाग प्रमुख अमर जाधव, युवा उदयोजक अमित साळवी, तालुका युवा सेनधिकारी सुनिल गुख, मनसेचे मंगेश नारकर आदि प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

अजित यशवंतराव म्हणालेकि मतदार संघांचा सर्वांगीन विकास करावयाचा असेल तर नारायण राणेसारखा हक्काचा माणूस आपण लाकसभेत पाठविला पाहिजेतरच आपला विकास होईल, असे सांगितले. मनोहर खापणे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आप- आपसातील मतभेद बाजुला ठेऊन नारायण राणेना भक्कम साथ देण्याची गरज असल्याचे सांगितले.