माजी मुख्यमंत्री ना. नारायण राणे यांना मत म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील जनतेने ऋण फेडण्याची संधी!! : अशोक दळवी

दोडामार्ग तालुक्यातील मतदारसंघातील गावागावात भेट देत प्रचार

माजी आमदार राजन तेली यांची उपस्थिती

दोडामार्ग :सुहास देसाई
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नारायण राणे साहेब यांच्या विजयात तालुका वासियाचे मोठे योगदान असायला हवे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांनी तालुका निर्मिती केली. त्यामुळे नारायण राणे यांना मत म्हणजे दोडामार्ग तालुक्यातील जनतेला ऋण फेडण्याची संधी असून
त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांनी पिकुळे येथे केले

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा प्रचार करण्यासाठी संध्याकाळी पिकुळे मधली वाडीत येथे घेण्यात आली. माजी आमदार राजन तेली, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, सेनेचे तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस ,जिल्हा संघटक गोपा उवल गवस, शैलेश दळवी, संदीप गवस, उप तालुका प्रमुख तिलकांचंन गवस, विठोबा पालयेक,र युवा सेना प्रमुख भगवान गवस, सरपंच आपा गवस, सरपंच अनिल शेटकर, माजी सरपंच दिक्षा महालकर, महीला सेना प्रमुख चेतना गडेकर, मनीषा गवस संदीप दळवी, सुभाष  गवस आदी उपस्थित होते.

पिकुळे गावात प्रचार सभेत बोलताना गणेश प्रसाद गवस यांनी सांगितले की दोडामार्ग तालुका निर्मिती केली त्यामुळे यावर्षी प्रथमच त्यांना मतदान करण्याची संधी लोकसभेचे निवडणूकीत मिळणार त्यातुन त्यांना पुन्हा केंद्रीय मंत्री पदावर विराजमान होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या तयारीत सर्व युतीचे कार्यकर्ता काम करत आहेत त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले पिकूळे गावात झालेली विकास कामे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून झाली आहे उर्वरित कामे भविष्यात केली जातील असे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले की पंतप्रधान मोदी यांनी अनेक गाव पातळीवर सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक योजना केंद्राच्या माध्यमातून आणल्या याचा लाभ सर्वांना होत आहे माजी सैनिक सीमेवरील आहेत याचे सोबत कार्यक्रम साजरा करतात यापूर्वी असे होत नव्हते यासाठीच भाजपला मतदान करण्याची संधी मिळाली आहे यासाठी आपण तालुका निर्मितीचे शिल्पकार ना.नारायण राणे साहेब यांना निवडून देऊया दोन तास देशासाठी काहीतरी करुया असे आवाहन त्यांनी केले यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले या सभेला मोठ्या संख्येने महीला उपस्थित होत्या.