रत्नागिरी : तालुक्यातील गोळप येथे दोन सख्ख्या भावांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून दोघांवर तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर प्रहार करून हा खून केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. शनिवारी भर रत्नागिरी शहरात एका वॉचमनचा निर्घृण खून केल्याची घटना ताजी असतानाच या दुसर्या घटनेने रत्नागिरी हादरली आहे.
उपलब्ध माहितीनुसार रत्नागिरी शहरानजीकच्या गोळप गावातील मुकादम यांच्या आंबा बागेत ही घटना घडली आहे. आज सकाळी आठ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. बागेत रखवाली करणाऱ्या दोन नेपाळी गुरख्यांचे मृतदेह दिसुन आले. डोक्यात खोलवर प्रहार करीत या दोन गुरख्याना मारण्यात आले होते. रत्नागिरी पोलीस घटनास्थळी पोहचले असून श्वान पथक देखील मागवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी हे ही घटनास्थळी रवाना झाले असल्याचे समजते.










