वायरी-भुतनाथ क्षेत्र नियुक्ती : भाजपा जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण वायरी येथील भाजप युवा कार्यकर्ते उद्योजक केदार झाड यांची भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप जिल्हा प्रवक्ते तथा वायरी-भुतनाथ जिल्हापरिषद मतदारसंघ निरीक्षक बाबा मोंडकर यांनी दिली आहे.
भाजपा जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पक्ष संघटनेच्या धेय्य धोरणानुसार काम करणार असल्याचे केदार झाड यांनी सांगितले आहेत. सर्व भाजपा महायुती पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबतीने काम करताना होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत राणे साहेबांना मोठे मताधिक्य या परिसरातून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही केदार झाड यांनी सांगितले.












