किरकोळ कारणातून शिव मध्ये दोघांना मारहाण

crime marhan

 

खेड(प्रतिनिधी) अंगणात सायकल लावली या किरकोळ कारणातून दोघांना काठीने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार २८ एप्रिल रोजी शिवबुद्रुक भोईवाडी येथे घडला

जगन तुकाराम लवंदे , जान्हवी जगन लवंदे दोन्ही रा- शिवबुद्रुक भोईवाडी अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत तर या प्रकरणी सौ. जानकीबाई काशीराम लवंदे वय ६५ रा- शिव बुद्रुक भोईवाडी यांनी तक्रार दाखल केली आहे

यातील संशयित जगन लवंदे यांच्या मुलाने त्यांची सायकल फिर्यादी जानकीबाई काशीराम लवंदे यांच्या अंगणात लावलेली होती. सदरची सायकल काढण्यासाठी फिर्यादी यांचे पती काशीराम लवंदे यांनी सांगीतले असता त्या ठिकाणी बाचा बाची व शिवीगाळ करून जगन तुकाराम लवंदे ,जान्हवी जगन लवंदे यांनी बांबुच्या काठीने फिर्यादी यांचे पती काशीराम लवंदे यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर व पंज्यावर मारहाण केली या मध्ये सौ. जानकीबाई काशीराम लवंदे , काशीराम लवंदे हे जखमी झाले