खेड(प्रतिनिधी) खेड तालुका विधी सेवा समितीतर्फे तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश- १ डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनानुसार श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल खेड येथे बाल मजूर व बाल तस्करी तसेच बाल विवाहावर बंदी या विषयांवर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.
यावेळी सह दिवाणी न्यायाधीश क स्तर खेड एस. एम. चव्हाण यांनी १८ वर्षे वयोगटाखालील मुलांना त्यांच्या इच्छेविरुध्द बालमजूर म्हणून हॉटेल, धोकादायक कारखाने, खाणी अशा स्वरुपाच्या ठिकाणी कामाला लावणे हे संविधानाच्या कलम २४ नुसार गुन्हा असून संविधानाच्या कलम २३ नुसार बंदी घालण्यात आलेली आहे, असे सांगितले. कार्यक्रमास सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर खेड श्रीमती मनीषा पाटील आदी उपस्थित होते.











