जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज कॉलेज इमारतीचे उद्या नितीन गडकरी, सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

Google search engine
Google search engine

Bhumi Pujan of Jagadguru Narendracharyaji Maharaj College Building by Nitin Gadkari and Samant

नाणीज : श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्रचायजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या कॉलेज इमारतीचे भूमिपूजन ३० मार्च रोजी केंद्रीय रस्ते, परिवहन व वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.
३० मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान श्री गडकरी व श्री सामंत यांचे सुंदरगडावर आगमन होईल. त्यानंतर त्यांच्या हस्ते जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या येथे उभारण्यात येणाऱ्या महाविद्याल इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. यावेळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज , प.पू. कानिफनाथ महाराज उपस्थित राहणार आहेत.या भूमिपूजन सोहळ्यानंतर श्री गडकरी यांचे संतपीठावर आगमन होईल. ते श्रीराम नवमी उत्सव सोहळ्यात काही काळ सहभागी होतील.

यावेळी संस्थानतर्फे श्री गडकरी व श्री सामंत यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी दोघेही उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत.येथील जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परिसरातील गोरगरीब मुलांना इंग्रजी माध्यमाचे मोफत शिक्षण देत आहे. आता येथे इंग्रजी माध्यमाच्या १२ वी पर्यंत शिक्षण दिले जाते. पुढील कॉलेज शिक्षणासाठी इमारतीची आवश्यकता होती. त्याचे भूमिपूजन मंत्र्यांच्या हस्ते होत आहे. येथील बारावीचा निकाल सलग तीन वर्षे शंभर टक्के लागला आहे. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या या इन्स्टिट्यूटचा लौकिक दिवसेदिवस वाढतो आहे.दरम्यान वारी उत्सव सोहळ्यासाठी भावीक सुंदरगडावर येण्यास सुरुवात झाली आहे. उद्या व परवा असा दोन दिवस हा वारी उत्सव आहे.