मसुरे | झुंजार पेडणेकर : जि प पूर्ण प्राथमिक शाळा वायंगवडे नं. १ व प्राथमिक शाळा वायंगवडे पडोसवाडी नं. २ शाळा विध्यार्थी व गावातील सर्व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना कै जगन्नाथ सहदेव परब यांच्या स्मरणार्थ जयेंद्र जगन्नाथ परब व जयश्री जगन्नाथ परब यांच्याकडून विध्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. उपसरपंच विनायक काशीराम परब यांच्या संकल्पनेतुन मुलाना शालेय दप्तर वाटप करण्यात आले.यावेळी उपसरपंच विनायक परब,सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.