ओटवणे (प्रतिनीधी) सर्व पक्षीय पुढारी व कार्यकर्ते यांना गावात प्रचार बंदी घातली गेली असून तसा बॅनर असनीये गावच्या प्रवेश द्वारावरच लावण्यात आला आहे.असनिये सारखा दुर्गम गाव आज फळ बाग शेतीने सधन आहे पण इतर सोई सुविधा,रस्त्यांची झालेली दुर्दशा आणि यंत्रणेचा वेळकाढू पणा या विरोधात ग्रामस्थानी बंड उगारला असून लोकसभा निवडणूकीची अचूक वेळ साधत राजकिय पक्षांना पुढाऱ्यांना गावात प्रचाराला बंदी घातली आहे .
एकतर या भागात सोई सुविधांचा अभाव आणि या भागातील रस्त्याच्या दुर्दशेमुळे असनिये घारपी हा प्रवास जीव मुठीत घेवून करावा लागतो.त्यातच एखादं काम आंदोलन उपोषण करून मंजुर करून घेतलं तर त्यासाठि वर्षभर वाट पहावी लागते . याच उदाहरण म्हणजे असनिये घारपी मुख्य रस्त्याचे काम ज्याच्या नूतनीकरनासाठी निधी मंजुर असूनही गेले वर्षभर काहिच हालचाल नाही. पण यासाठी आंदोलन करा काही ते करा मिळणार फक्त आश्वासनं मग अस असताना मतदान मागण्यासाठी येणाऱ्या पुढाऱ्यांना याचा जाब का विचारू नये आणि त्यांना प्रचारासाठी बंदी का घालू नये असा संतप्त सवाल असनिये ग्रामस्थ करीत आहेत.
याच भागातून शाळा कॉलेज मध्ये एस.टी.ने जाणारी मुले आहेत सध्याची रस्त्याची अवस्था बघता एस. टी मंडळाने इस. टी. बंद करण्याचा निर्णय घेतल्यास मुलांच्या शैक्षणिक नुकसानास जबाबदार कोण. त्यामुळें या सर्व समस्यांवर तोडगा निघत नसल्यानेच अशी वेळ ग्रामस्थांवर आली आहे.












