मांगवलीत उबाठाला धक्का : माजी शाखाप्रमुख विजय आयरे व असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

नासीर काझी, भालचंद्र साठे यांनी सर्वांचे केले भाजपामध्ये स्वागत 

वैभववाडी l प्रतिनिधी :      वैभववाडी तालुक्यात भाजपा मध्ये प्रवेशाची मालिका सुरूच आहे. मांगवली गावचे माजी शाखाप्रमुख विजय आयरे यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह मांगवली गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. वैभववाडी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, माजी सभापती भालचंद्र साठे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश पार पडला.

 

प्रवेश करणाऱ्यांमध्ये मांगवलीतील शाखाप्रमुख विजय आयरे, सुरेश आयरे, परशुराम आयरे, मालती आयरे, प्रदीप आयरे, महेंद्र आयरे, मयूर आयरे, विशाल मोरे, प्रतीश आयरे, प्रमोद मोरे, नितेश मोरे यांचा समावेश आहे. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे साहेब यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे यावेळी विजय आयरे यांनी सांगितले. नासीर काझी, भालचंद्र साठे यांनी सर्व पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

 

यावेळी माजी सभापती अरविंद रावराणे, वेंगसर माजी सरपंच रामदास पावसकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अतुल सरवटे, दिलीप बेळेकर, तिथवली युवा मोर्चा विभागीय अध्यक्ष रुपेश गुरव आदी उपस्थित होते.