कोकणासाठी सहकाराची विशेष योजना आणावी 

पालकमंत्री उदय सामंत यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी 

रत्नागिरी | प्रतिनिधी :भाजपा महायुतीचे उमेदवार ना. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या महासभेत बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले अमित भाई शाह यांनी पुढाकार घेतला आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले हे आम्ही विसरणार नाही,

 

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार उत्तम काम करत आहेच आता रत्नागिरीत पर्यटनाच्या दृष्टीने काम करताना कोकणासाठी सहकाराची विशेष योजना आपण आणावी , रोजगार देणारा प्रकल्प आपण द्यावा अशी मागणी ना. सामंत यांनी केली. तर रत्नागिरीतून मोठे मताधिक्य मिळेल विश्वास देतो असेही ना सामंत म्हणाले