ऑलिंपियाड परीक्षेत एडगाव नं 1 चे इंद्रनील, सार्थक जिल्ह्यात अव्वल

 

वैभववाडी l प्रतिनिधी :       एक्सलंट ऑलिंपियाड फाउंडेशन, पुणे आयोजित सन 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एक्सलंट ऑलिंपियाड परीक्षेमध्ये एडगाव नं. 1 शाळेचे विद्यार्थी कु. इंद्रनील अमोल येनगे (इयत्ता पहिली) व कु. सार्थक सचिन कांबळे (इयत्ता तिसरी) यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे.

 

इंद्रनील येनगे याने यापूर्वी झालेल्या मंथन परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. तसेच शाळा स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये अव्वल ठरला आहे. सार्थक कांबळे याने देखील संदेश युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आयोजित एस.टी.एस. परीक्षेमध्ये वैभववाडी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला होता व इतर शालेय व शाळाबाह्य स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. या यशाकरीता दोन्ही विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक चेतन बोडेकर, दीप्ती पाटील, पालक अमोल येनगे, सचिन कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

एकाच शाळेचे दोन विद्यार्थी जिल्ह्यामध्ये अव्वल ठरल्याबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, विस्तार अधिकारी अशोक वडर, केंद्रप्रमुख रामचंद्र जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रताप रावराणे यांनी अभिनंदन केले.तसेच इतर पालक वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे.