नारायण राणे म्हणजे विकास कामाचे वाघ ; त्यांनाच निवडून द्या – राज ठाकरे

जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला आणि प्रश्न सोडविण्याची ताकद असलेला नेता म्हणजे नारायण राणे 

कणकवली येथील जाहीर प्रचार सभेत राज ठाकरे यांनी नारायण राणे यांच्या विजयाचे केले केले आवाहन

संतोष राऊळ ( कणकवली)

कोकणी जनतेला दिल्लीत जावून लोकसभेत नुसताच बाकड्यावर बसणारा खासदार पाहिजे की केंद्रिय मंत्री बनेल असा खासदार पाहिजे.नारायण राणे म्हणजे कामेचे वाघ आहेत.त्यांनी मुख्यमंत्री असताना झपाटलेल्या सारखे काम त्यांनी केले. कामाचा वाघ जर कोण असेल तर नारायण राणे आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने काम केले ते पाहिल्यानंतर त्यांना सह महिने मिळालेले मुख्यमंत्री पद पाच वर्षे मिळाले असते तर कोकण जगाच्या नकाशावर कधीच प्रगत झाले असते असते.आणि आता प्राचर करायची गरजही राहिली नसती.जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला नेता.आणि ते प्रश्न सोडविण्याची ताकद नारायण राणे यांच्यात आहे.कोकणातील जनतेला आपल्या जमिनी विकाव्या लागणार नाहीत आणि नोकरीसाठी घरदार सोडून दुसरी कडे जावे लागतं नाही असा विकास करण्याची धमक फक्त नारायण राणे यांच्यात आहे.त्यामुळे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या कमळ निषणीसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. येथील कोणाचे प्रश्न जे तुमच्या आमच्या मनात आहेत ते आम्ही सर्वजण पूर्ण करून घेवू.असा विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी कणकवलीत जाहीर सभा घेत जनतेला संबोधित केले.

एक उदाहरण देताना राज ठाकरे म्हणले,अभय बंग यांना घेवून अनिल शिदोरे घेवून नारायण राणे यांचे कडे गेले. बालमृत्यू कोपोषन या विषयीची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी त्यांनी सभागृहात मांडला.मुद्दा आणि त्यावर सभागृह चिडीचूप झाले. एकदा विषय कसा समजून घ्यावा तो कसा मांडायचा हे राणे यांचेकडून शिकावे. काम घेवून गेल्यावर ते नाही म्हणणार नाहीत.मार्ग कडून विकास काम करणार. त्यामुळे कोकणी जनतेला त्यांची गरज आहे.असे राज ठाकरे म्हणाले.

सुजाण नागरिक असणारा कोकण आहे.पाठींबा जाहीर केल्या नंतर ही पाहिली सभा आहे.मी सरळ चालणार माणूस आहे.मी बैल चालता चालता मुततो तसा मी कधीच विचार करत नाही.ज्या गोष्टी नाही पटत त्या नाही आम्ही ज्या गोष्टी आवडल्या त्या आवडल्या. ज्या गोष्टी पटल्या त्याचे जाहीर कौतुक करणारा माणूस मी आहे. ३७० चे कलम रद्द झाले. हे मोठे काम झाले. नरेंद्र मोदी यांचे सरकार आले आणि त्याचे सरकरणे हे ३७० कलम हटविले. आज पर्यंत इतर कोणीच हटवू शकले नाही.

बाबरी मशीद पडण्यापूर्वी

*कोण कुठचा बाबर आणि त्याला सांभाळणारे आमच्या अवलादी. ९२ साली ती बाबरी मशीद पाडली गेली. मात्र त्यापूर्वी हिदू कार सेवकांना गोळ्या घालून मारले.मात्र आता हे राम मंदिर नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाले आणि शहीद झालेल्या आत्म्यांना शांती मिळाली.

मित्राची खरडपट्टी काढायला मागे पुढे पाहू नये आणि दुष्मनची चांगल्या गोष्टीला स्तुती करण्यास मागे राहू नये. यांच्या सारखे आमचे नाही बदल्यात काही हवे म्हणून मी भूमिका घेत नाही. त्यावेळी भाजप ने आडिज वर्षे मान्य केली असती तर तुम्ही आज बोलला असता काय.ती हिरावून घेतली म्हणून बुदाखली आग लागली.

२०१४ ते२०१९,साडेसात वर्षे सत्तेत होता. का गेले उद्योग ?अणुऊर्जा प्रकल्प गुजरात,मद्रास,उत्तर ,राजस्थान,तारापूर,कुंडकुळंम,तामिळनाडू असे असले प्रकल्प आहेत.भाभा अणुऊर्जा प्रकल्प मुंबई मध्ये आहे तेथे कधी फुटणार अशी चर्चा नाही. आता नानर ला आणि त्यानंतर बरसू मध्ये रिफायनरी येणार त्या जमिनी कशा मिळतात त्याठिकाणी तो प्रकल्प येतो हे कसे कळते. याचीच लोक १० रुपयांनी जमिनी घेवून १००रुपयांनी विकतात. यांचा विरोध हा त्यासाठीच आहात. हा सर्व प्रकार जमिनीच्या दलालितून झालेला आहे.

बाजूचा गोवा पहा त्याठिकाणी संपूर्ण जग जात. गोव्यातील बीच वर जे चित्र दिसले तर २०२०पेक्षा गर्दी होईल. मात्र तसे झाले तर संस्कुती बिघडेल म्हणून बोंब मारतील. गोव्यात संस्कृती नाही काय ?

स्वतःच्या देशाची प्रगती करण्यासाठी एक देश आपल्या धर्माला बाजूला सारून पुढे जात असतील तर आपणही विचार केला पाहिजे.जैवविविधतेने नटलेल्या आपल्या प्रदेश जगात दोन नंबर ला येतो.