ओटवणे शेरवाळवाडी ब्राह्मण मंदीर वार्षिक उत्सव 10 मे रोजी.

 

ओटवणे(प्रतिनीधी) दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ओटवणे शेरवाळवाडी येथील श्री ब्राह्मण मंदीर वार्षिक उत्सव शुक्रवार १० मे रोजी विविध धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.

या निमीत्त मंदिरात सकाळ पासूनच धार्मीक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. श्री ९. वाजता गणेश पूजा,११ वा. सत्यनारायण महापूजा,१२ वा. महाआरती,१.३० वा. महाप्रसाद, सायं.४ ते ५.३० ग्रामस्थांचे भजन, ५.३०ते ६.३० ज्ञानेश्वर हरिपाठ,६.३० ते ७.३० महिलांचे कार्यक्रम,७.३० ते ९ लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ ९ ते ९.३० दांडीया नृत्य,रात्रौ ठीक ९.३० वाजता श्री कलेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ नेरूर यांचा ट्रिकसिन युक्त त्रिखुर ब्रह्मांड प्रलय हा दशावतार नाटय प्रयोग सादर होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शेष साक्षात्कार सेवा समिती आणि शेरवाळवाडी ग्रामस्थ यांच्याकडून कऱण्यात आले आहे.