दोडामार्ग – मोर्ले, केर आणि घोटगेवाडी परिसरातील गावात बीएसएनएलची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे यासाठी मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस यांसह केर येथील ओमकार देसाई, मोर्ले येथील विजय रेडकर, अजित गवस यांनी तिलारी नदीच्या पात्रातून वायर काढणे ते जॉईन करणे यासाठी सहकार्य केले त्यामुळे ही सेवा पूर्ववत सुरू झाली आहे
या भागात मोर्ले, केर आणि घोटगेवाडी गावांना बीएसएनएल चे नेटवर्क हाच पर्याय आहे. बीएसएनएल ला जोडणारी ओएफसी केबल ही घोटगेवाडी येथील नदीतून जाते. या नदीला तिलारी धरणाचे पाणी सोडल्यावर वायर वाहून जाते आणि तूटते मग पाणी कमी व्हायची वाट पाहावी लागते पाणी कमी झाल्यावर स्थानिक सहकार्य करतील पण बीएसएनएल कर्मचारी यांनी यावे असे सांगण्यात आले त्यानंतर कर्मचारी त्यांना स्थानिकाच्या सहकार्य केल्याने सेवा सुरू झाली
दरवर्षी पाऊस आणि नदीला पाणी आले की आठ आठ दिवस रेंज जाते. आता मेहनतीने केबल जॉईन झाली पण पुन्हा कधी पाण्याच्या प्रवाहात तुटेल हे सांगता येतं नाही. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे आणि जी केबल शॉर्टकट आहे ती भटवाडी मार्गे आणावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे












