मुळ पुरुष मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहणाचा उद्या सोहळा

 

कणकवली : तळेरे येथील मुळ पुरुष मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा गुरुवार ९ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

 

सकाळी ८:३० वा. धार्मिक विधी, दुपारी १ वा. महाप्रसाद, दुपारी ३:३० वा. देवदर्शन व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६ वा. ओमकार म्हाडदळकर यांचे भजन, ७:३० वा. श्री गांगेश्‍वर प्रा. भजन मंडळ, तळेरे-गावठण यांचे भजन, रात्री ९:३० वा. ह. भ. प. शरद घाग यांचे कीर्तन होणार असून त्यांना प्रसाद शेवडे, अभिनव जोशी, विकास नर हे संगीतसाथ करणार आहेत. तरी कार्यक्रमांचा सर्वांनीलाभ घ्यावा, असे आवाहन जठार कुटुंबीय व गांगेश्‍वर प्रा. भजन व नाट्यमंडळाने केले आहे.