हरकुळ बु. येथे उद्यापासून विविध कार्यक्रम

 

कणकवली : हरकुळ बुद्रुक येथील श्री देव इस्वटी महापुरुष देवालयात ९ ते ११ या कालावधीत श्री देव इस्वटी महापुरुष सप्तप्रहरी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार आहेत.

 

गुरुवार ९ रोजी सकाळी ९ वा. उदक शांती, होम हवन, सायंकाळी ५ वा. ज्येष्ठ व दानशूरांचा सत्कार सोहळा, रात्री 8 वा. रामकृष्ण हरी महिला भजन मंडळ, सेवासंघ तेंडोलीचे बुवा जुई राऊत यांचे भजन, ९ वा. सांप्रदायिक वारकरी भजन मंडळ, हळवल यांचे भजन होईल.

 

शुक्रवार १० रोजी सकाळी ८:३० वा. घटस्थापना व अभिषेक, ९:३० वा. अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ, ११:३० वा. दत्तकृपा प्रा. भजन मंडळ, वैभववाडीचे बुवा विराज तांबे यांचे भजन, सायंकाळी ५ वा. स्थानिकांची दिंडी मिरवणूक, ६ वा. भजनांचा कार्यक्रम, रात्री ९ वा. विश्‍वकर्मा महिला दिंडी भजन मंडळाचे बुवा नंदू मेस्त्री यांचे भजन, १० वा. श्री लिंगेश्‍वर पावणादेवी वारकरी दिंडी भजन, कासरल-बांदेवाडी यांचे आकर्षक वारकरी देखावे. शनिवार ११ मे रोजी ९ वा. भजने, ९:३० वा. घटविसर्जन, दुपारी १२:३० वा. महाप्रसाद होईल. तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन काळेथरवाडी मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.