सुरेश सावंत यांचे गौरीशंकर खोत यांचा घेतला खरपूस समाचार
कणकवली : जमिनी विकून कमिशन एजंट असणारे गौरीशंकर खोत कोण आहेत ? त्यांची जनतेला ओळख काय ? मुंबईमध्ये राहूनही स्वतःचे नांदगाव मध्ये घर बांधू शकला नव्हता. भाजप नेते नारायण राणे यांनी इंजीनियरिंग कॉलेजचे अध्यक्ष केल्यानंतर त्याठीकांचे चिरे,वाळू, टाईल्स नेवून सुमारे एक कोटी चे घर बांधले. मुलांकडून डोनेशन घेवून ते पैसे आणि कॉलेजच्या बांधकाममधील पैसे अशा अनेक कामातुन स्वतःचे घर बांधणाऱ्या गौरीशंकर खोत यांची माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या वर बोलण्याची लायकी नाही अशी टीका भाजप जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांनी केली.
अटल बिहारी वाजपेयी आणि गडकरी साहेबांचे नाव घेण्याची गौरीशंकर खोत यांची लायकी नाही. वडीलोपार्जित असलेले नांदगाव तिठ्यावराचे घर आणि अडीच एकर जमीन ही भावांना फसवून अकरा भावंडे असताना आपण स्वतःच्या नावे करुन घेतली. आणि त्या घरावर सध्या ताडपत्री टाकण्याची वेळ आपल्यावर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अस एकमेव घर असेल तर ते गौरीशंकर खोत याचे आहे.त्यावर ताडपत्री टाकलेली आहे. राणे साहेबांना सोडल्यानंतरच आपली बिकट परिस्थिती आली आहे. अशी जोरदार चर्चा जनतेमध्ये आहे. तसेच आपण नांदगाव मध्ये पाच सहा पार्टनर घेऊन जमीन विकत घेतली आणि त्याचे प्लोटिंग केले. पाच सहा जणांच्या इंनवेस्टमेंट पैशामधुंनच आपण आपल कमिशन आधीच बाजुला कादून घेतल. आता ते प्लॉट विक्रीला जात नसल्यामुळे आपल्या बरोबरचे असलेले पार्टनर भिकेला लागलेले असल्यामुळे आपल्या नावाने बोंबाबोंब करत आहेत. तसेच आपण रस्ता बंद करणे, लोकांचे पाणी बंद करणे याचीही चर्चा नांदगाव मध्ये सुरु आहे. आपण १९९० साली राणे साहेबांना मी आणलं म्हणता राणे साहेब गुजरातचे आहे? की कर्नाटकचे आहेत? त्यांचं गाव त्यांना माहिती नव्हत की काय? आपण आपल्या बरोबर चारशे मानस आणली म्हणता मग ती मानस आता कुठे गेली. आपल्या बरोबर कशी काय राहिली नाही. तर ती माणस तुमची नव्हती तर राणे साहेब नगरसेवक असताना तसेच बीएसटी मध्ये १५ वर्ष चेअरमन असताना ज्या ज्या लोकांना मदत केली होती तसेच तीर्थराज कदम करुळ ज्यांची युनियन ताज ओबेरॉय अशा मोठ्या हॉटेल मधे होती त्यांच्याबरोबर आलेले लोक. हण्या परब, नंदु सावंत, रवी शेडगे आणि बीएसटी आणि इन्कम टॅक्स मध्ये काम करणारे अश्या सर्वांचे मिळुन ते ४०० लोक होते त्यापैकी आपला कोण एकही माणूस नव्हता. त्यापैकी २५ लोक माझ्या घरामध्ये राहत होते ही वस्तुस्थिती आहे. साहेबांच्या इंजिनीरिंग कॉलेजला काँग्रेसचे माजी आमदार कै. केशव रावराणे यांनी जमीन घ्यायला मदत केली त्यात गौरीशंकर खोतचा कुठलाही संबंध नाही. तसेच १९९७ मध्ये साहेबांबरोबर आयुष्यभर असलेले मित्र नंदु सावंत यांना नाटळ जि.प. मतदार संघामध्ये उमेदवारी मिळावी त्यासाठी सर्व नाटळ मधील कार्यकर्त्यानी राणे साहेबांकडे आग्रह धरला होता परंतु आपण चांडाळ चौकडीने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला कारण तो गुंड आहे. त्याजागी संचयनी घोटाळ्यातील जेलमधून बाहेर पडलेले सतीश सावंत यांना उमेदवारी दिली त्यावेळी त्यांचा शिवसेना पक्षाशी कोणताही संबंध नव्हता. तसेच नांदगाव मधील नागेश मोरये हे संघटनेसाठी अहोरात्र संघटनेचे काम करायचे आणि खरी शिवसेना या जिल्ह्यांमध्ये त्यांनीच वाढवली आणि अशा मानसाला देखील आपण चांडाळ चौकडीने नांदगाव फंडा मधे व्याजाचा धंदा करतो असे सांगुन आपण त्यांनाही नेस्तनाभुत केले. अशा प्रकारे अनेक कार्यकर्त्याना आपण राणे साहेब आजारी आहेत, राणे साहेब भडकतील, राणे झोपले आहेत, आताच आले आहे, आराम करतायत अशा प्रकारे राणे साहेबांच्या बंगल्याच्या दरवाजावर कायमची दोन माणस ठेऊन राणे साहेबांना भेटण्यासाठी मज्जाव केला आहे. त्यामुळे बहुसंख्य राणे साहेबान बरोबर असणारे लोक आपल्या चांडाळ चौकडीमुळे राणे साहेबां पासुन दुर गेले.
मी प्रथम सर्व देवतांचे आणि परमेश्वराचे आभार मानतो की, ही सर्व चोर चांडाळ मंडळी यांना सावंतवाडी मध्ये जाव लागलं. हिंदुंच्या पवित्र सणादिवशी जनता लक्ष्मीची पुजा करते त्या दिवशी ही चोर चांडाळ मतांची सावंतवाडी मध्ये भीक मागत होती. तरी या साधुसंतांच्या पवित्र भुमिमध्ये खोटे जास्त दिवस चालत नाही. या जिल्ह्यात उंटावरून सोने आणलेले लोक पण नाहीशे झालेले आहेत हे लक्षात ठेवावे. असे सुरेश सावंत यांनी सांगितले आहे.












