मालवण | प्रतिनिधी : स्थानिक आमदार, खासदार यांनी रस्ता प्रश्न बाबत काहीच केले नाही. त्यामुळे ग्रामस्थानी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांच्या मागणी नुसार भाजपा नेते निलेश राणे गावात दाखल झाले. गावातील रखडलेला रस्ता प्रश्न आठ दिवसत मार्गी लावणार. असा शब्द निलेश राणे यांनी ग्रामस्थांना दिला. त्यावर विश्वास व्यक्त करत पेंडूर भटवाडी, मोगरणे बोराळवाडी येथील काही ग्रामस्थानी मतदान न करण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घेत उत्स्फूर्तपणे मतदान केले.
लोकसभा निवडणूकिसाठी रविवारी मतदान प्रक्रिया सूरू असताना मालवण तालुक्यातील पेंडूर गावातील काही ग्रामस्थानी प्रलंबित रस्ता प्रश्न बाबत मतदान न करण्याचा निर्णय घेतला. रस्ता प्रश्न बाबत गेली अनेक वर्षे येथील स्थानिक आमदार, खासदारांनी लक्षच दिला नाही.
काही महिन्यांपूर्वी या रस्त्यांचे भूमिपूजन झाले मात्र काम सुरूच झाले नाही. ह्यावर्षी पण आपण खड्ड्यातूनच प्रवास करायचा का ? हाच विषय डोक्यात ठेवून येथील जनतेने लोकसभा निवडणूक दिवशी मतदान न करण्याचा पवित्र घेतला. येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु लोक कोणत्याही परिस्थितीत ऐकायला तयार नव्हते. अखेर या लोकांनी आपण निलेश राणे यांच्याशी बोलून पुढील निर्णय घेऊ असे सांगितले. सदर गोष्ट निलेश राणे यांच्या कानावर पोहचताच अवघ्या काही तासातच निलेश राणे पेंडूर गावात पोचले. जमलेल्या लोकांची समस्या ऐकून घेत म्हणाले, नेमके या रस्त्यांचे काम कशामुळे रखडले आहे. भूमिपूजन होऊनही रस्त्याचे काम का सुरू झाले नाही. या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन येत्या आठ दिवसातच हा प्रश्न तुमच्या सोबत बसून निश्चितच मार्गी लावणार. असा शब्द निलेश राणे यांनी दिला. ना आमदार, ना खासदार पण निलेश राणेंचा शब्द विश्वास मानून ग्रामस्थानी मतदानाचा हक्क बजावला. निलेश राणे यांच्यावर जनतेमध्ये असलेला विश्वास पुन्हा एकदा दिसून आला.











