यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजन
मसुरे | झुंजार पेडणेकर : मुणगे गावाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजना अंगणवाडी सेविकांना प्रभाग क्रमांक एक सदस्यता सौ. रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत, माजी उपसरपंच /सदस्य श्री धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ सायली बागवे यांच्या पाठपुराव्याने मुणगे गावातील एकूण ६ अंगणवाडी सेविकांना गणवेश ( साडी ) वाटप करण्यात आले. यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ यांच्या वतीने सदर गणवेश वाटप कार्यक्रम झाला. उपस्थितांच्या वतीने अध्यक्ष आनंद मालाडकर यांचे आभार मानण्यात आले.