मसदे-विरण अंगणवाडीलाला ISO नामांकन !

Google search engine
Google search engine

मसुरे | झुंजार पेडणेकर : मालवण तालुक्यातील तालुक्यातील मसदे-विरण अंगणवाडी क्रमांक ९६ ला ISO नामांकन प्राप्त झाले असून याचे वितरण जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या हस्ते करण्यात आले.
ISO नामांकन ही जागतिक संस्था असून विविध निकषावर शाळा, अंगणवाडी यांची पाहणी करून समितीच्या वतीने प्रभाव पाहून ISO नामांकनासाठी निवड करण्यात येते. यासाठी मालवण तालुक्यातील अंगणवाडी मसदे-विरण ची निवड निकषानुसार झाल्याची माहिती ग्रोफास कन्सल्टन्सी अधिकारी सहदेव चव्हाण यांनी दिली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात बाबा परब, माजी जी प सदस्य अनिल कांदळकर, सरपंच श्रेया परब, उपसरपंच – कलाधर कुशे, ग्रामपंचायत सदस्य शमिका वाडेकर, बाळू कडकड, गुरुनाथ परब, ग्रामसेवक बी. पी. जाधव, मदतनीस उर्मिला पांजरी, सेविका स्पृहा माडीये व इतर उपस्थित होते.