साळेल येथे मसाला युनिटचा शुभारंभ!

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत उभारणी

मसुरे | झुंजार पेडणेकर : साळेल थळकरवाडी येथील श्रीम.पूजा बजरंग गावडे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत स्थापीत केलेल्या श्री समर्थ मसाले या युनिटचा शुभारंभ मालवण तालुका कृषी अधिकारी श्री.विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच श्री.रविंद्र साळकर, कृषि अधिकारी मालवण श्री.दिनेश लंबे माजी प स सदस्य श्री.कमलाकर गावडे, कृषी सहा. श्रीम.मनिषा गिते,श्री.रोशन गावडे, श्री. बजरंग गावडे,श्रीम.साक्षी परब, श्रीम संपदा गावडे, श्रीम. साक्षी गावडे, श्रीम गायत्री गावडे तसेच बचत गट महिला व शेतकरी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना योजना अंतर्गत माहिती देण्यात आली. तसेच जास्तीत जास्त शेतकरी यांनी लाभ घेण्यासाठी आवाहन केले. यावेळी श्रीम. पूजा गावडे यांनी प्रक्रिया युनिट मुळे स्वतः ला रोजगार मिळाला व वाडीतील/गावातील लोकांना दूरवर जावे लागणार नाही वेळ वाचेल असे मनोगत व्यक्त केले.