प्रतिनिधी | मंडणगड : मंडणगड शहरातील नामांकित महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र पॉलिटेक्निक
महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्रा. अरूण ढंग
यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाविद्यालयाचे प्राचार्य पद रिक्त होते. दळवी एज्युकेशन ट्रस्ट चे संचालक अजय दळवी यांनी प्रा. अरूण ढंग यांच्याकडे प्राचार्य पदाची जबाबदारी सोपवली आहे.
प्रा. अरूण ढंग यांच्या नियुक्तीने महाविद्यालयाला पूर्णवेळ प्राचार्य मिळाले आहेत. प्रा. अरूण ढंग हे मुंबई विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे.
अरूण ढंग यांनी संगणक शास्त्र, भौतिकशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर पदवी, कायद्याची पदवी आणि पीएच.डी. होण्याच्या मार्गावर आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केल्यामुळे, तिच्याकडे अनेक संशोधन प्रकाशने आहेत. तब्बल सोळा वर्षाहून अधिक कालावधीपासून ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या कालावधीत त्यांनी वेगवेगळया विभागाचे कामकाज पाहिले. सोबतच त्यांचा सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असतो. सध्या ते महाराष्ट्र अंनिस मंडणगड येथील कार्याध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहेत. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात स्टार एज्युकेशन अवॉर्ड प्राप्त झालेला आहे.











