पहिल्या दिवशी राजीव गांधी स्कूलमध्ये नवगतांचे स्वागत

 

मंडणगड l प्रतिनिधी : तालुक्यातील राजीव गांधी इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये पहिलीच्या वर्गातील नवागत विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षकांनी केलेल्या या स्वागताने विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर निरागस हसूही उमलले. शाळेमध्ये पहिला दिवस विविध उपक्रम राबवित उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी स्कूल कमिटी चेअरमन संतोष मांढरे, मुख्याध्यापक श्री. शेडगे व उपमुख्याध्यापक श्री. महाजन, शिक्षक महेश सुतार, सचिन डहाळे, शिक्षिका सौ.कर्वे, नेहा वाणी, सौ. मोरे व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.