रत्नागिरीकरांची पाणी बाणी शहरात मात्र पाणीच पाणी

रत्नागिरी नगर परिषदेची अजब कामगिरी

रत्नागिरी :रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा असल्यामुळे 13 मे पासून रत्नागिरी शहरवासीयांना एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषद प्रशासनाने घेतला. यामुळे ऐन सुट्टीच्या हंगामात रत्नागिरीकरांवर पाणी बाणी करण्याची वेळ आली आहे.

 

एकीकडे शहर वासिय पाणी टंचाईने हैराण असताना मंगळवारी दुपारी रत्नागिरी नगर परिषदेच्या समोर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर नळ पाणी योजनेतील पाईप फुटून लाखो लीटर पाणी वाहून जात आहे. एकीकडे पाणी जपून वापरण्याचे आवाहन नगर परिषद करत असतानाच त्यांच्या कारभाराची विदारक स्थिती समोर आली असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे