नगरपंचयतीने कठोर कारवाई कऱण्याची आवश्यकता.
मंडणगड l प्रतिनिधी : सांडपाणी व्यवस्थापनाचे मुद्यांवर स्थानीक नगरपंचायत पुर्णपणे अपयशी ठरली आहे. स्वच्छते करिता वर्षानुवर्षे लाखो रुपयांचा निधी खर्च करुनही सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या वेळोवेळी डोके वर काढते व त्यावर यंत्रणेकडे उत्तर नाही. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बांधण्यात आलेली गटारे तोकडी व शून्य नियोजनाची असल्याने अनेक ठिकाणी सांडपाणी रस्त्यावरुन वाहते. याशिवाय सर्व गटरांचा शेवट हा शहरातील लहान ओढ्यांच्या माध्यमातून निवळी नदी कडे होत असल्याने सांडपाण्यामुळे पिण्याचे पाण्याचे जलस्त्रोत प्रदुषीत होण्याची भिती ही नागरीक वेळोवेळी व्यक्त करीत असतात.
मे महिन्यात सांडपाण्याचे दुर्गंधीने शहराचे बकालीकरणात आणखीनच भर टाकली आहे. शहरात डासांचे बारमाही अस्तित्वही गेल्या काही वर्षांपासून जाणवत आहे. निमशहरी मंडणगडची नैसर्गीक संरचना डोंगर उताराची आहे. गेल्या दोन दशकात शहरातील लोकसंख्या नव्या गृह प्रकल्पामुळे वाढली आहे. नगरपंचायतीस कर भरत असल्याने सांडपाण्यासाठी गटारे बांधणे व सांडपाणी शहराबाहेर सोडणे हे नगरपंचायत काम असल्याची बतावणी सगळेच करीत आहेत. दुसरीकडे नगरपंचायतीने आपली बहुतांश ताकद याकामी खर्च केल्यानंतरही समस्या संपली नसून वेळोवेळी गंभीर स्वरुप धारण करत असते. सांडपाण्याचे व्यवस्थापन नागरीकांना आपल्या जागेतच करावयाचे आहे असे असताना अनेक गृह प्रकल्पाचे पाणी रस्त्याचे शेजारी अथवा रस्त्यावर गटार गंगा म्हणुन वहात आहे.
ग्रामपंचायत ते नगरपंचायत परिवर्तनानंतरही परिस्थीती जैसे थे – स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापनाकरिता तत्कालीन ग्रामपंचायत आपल्या उत्पनांतील सर्वाधीक पैसे खर्च करत असे. नगरपंचायतीचे स्थापनेनंतरही या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. नगपंचायतीचा दर्जा हा केवळ कागदावर असल्याचे जाणवते. कारभारात आपेक्षीत गुणात्मक बदल अद्याप झालेले नाहीत. विकास आरखाडा नसल्याने ग्रामपंचायतीसारखेच रस्ते, पाखाड्या, संरक्षक भिती व गटारे वा पायाभुत सुविधांचे निर्मीतीपलीकडे कामाचे अस्तित्व दिसून येत नाही.












