परशुराम रुग्णालयात वृध्देचा आकस्मिक मृत्यु !

संग्रहित छाया

 

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील घाणेखुंट येथील परशुराम रूग्णालयात एका वृध्देला औषधोपचाकरीता दाखल केले असता तिचा आकस्मिक मृत्यु झाला हि घटना . १२ मे रोजी रात्री ११:१५ वाजता घडली आहे.

 

वैशाली विजय रहाटे (वय-५२, सध्या रा. पिरलोटे, साईनगर, ता. खेड, मूळ रा. तेलेवाडी – सोनगिरी, पो. आंबेड, ता. संगमेश्र्वर) असे या आकस्मिक मृत्यु झालेल्या वृध्देचे नाव आहे. तिच्या मुलांनी याबाबतची पोलिसांत खबर दिली
वैशाली विजय रहाटे (५२) यांना डाव्या बाजुला दोन वर्षापूर्वी लकवा गेला होता तसेच त्याचदरम्यान तिला हार्टअटॅकचा झटका सुध्दा आलेला होता. १२ मे रोजी रात्री १० :३० वाजताचे सुमारास ती छातीला हात धरून दुखत आहे असे ओरडत होती. त्यानंतर काही वेळाने तिला जास्त त्रास जाणवू लागल्याने त्या बसल्याजागी बेशुद्ध पडल्या म्हणून तिच्या मुलांनी लगेच रिक्षा घराजवळ बोलावून घेवून रिक्षाने परशुराम रुग्णालयात रात्री ११ वाजताचे सुमारास औषधोपचाराकरीता दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून रात्री ११:१५ वाजता मयत घोषित केले.