चिपळूण (प्रतिनिधी) : जिजाऊ ब्रिगेडतर्फे जनता हॉस्पिटल चिपळूण येथे डॉ. आर्शिवाद थत्ते, डॉ. अदिती थत्ते यांच्या येथे मातृदिन साजरा करण्यात आला.
संस्काराची शिदोरी ती म्हणजे आई असते. हजारो चुका माफ करणार ती म्हणजे आई. नुकतीच प्रसुती झालेल्या बाळाच्या आईना व बाळाला लागणारे साहित्य देऊन मातृदिन साजरा करण्यात आला. बाळाला व आईना भेटून आम्हाला खूप आनंद झाला व त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झाला व त्याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा डावा हात असणाऱ्या परीचारीकांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिजाऊ ब्रिगेड रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष स्नेहल चव्हाण, रत्नागिरी जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष रवीना गुजर, तालुका अध्यक्ष मिलन गुरव, वीणा जावकर, सुगंधा चिवटे, रोहिणी मोरे अशा अनेक जिजाऊंच्या लेकी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष मिलन गुरव व सहकाऱ्यांनी केले होते.










