परिचादिनानिमित्त इंडियन मेडीकल असोसिअशन (IMA) रत्नागिरी तर्फे आयोजन
दिनांक 12 मे 2024 रोजी नर्स डे चे निमित्त साधून इंडियन मेडीकल असोसिअशन (IMA) रत्नागिरी तर्फे “रंग माझा वेगळा” हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
कोरोना काळामध्ये सर्व कर्मचार्यांनी डॉक्टरांसोबत खांद्याला खांदा लावून सेवा दिली आहे. कोरोना काळात प्रत्येकजण आपल्या घरी सुरक्षित होता परंतु या सर्व नर्स व हॉस्पिटल मधील स्टाफ आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णाची काळजी घेत होते, रुग्णांसाठी झटत होते, रुग्णाना औषधे वेळेत मिळावेत, ऑक्सीजन व्यवस्थित मिळावे, जेवण व्यवस्थित व वेळेत मिळावेत यासाठी हॉस्पिटलचे सर्व स्टाफ काम करत होते. जिथे कोरोना मुळे मृत झालेल्या रुग्णाचे प्रेत स्वीकारत नव्हते तिथे त्या प्रेतास अग्नी देण्याचे काम हॉस्पिटल मधील स्टाफने केलेले आहे. किंबहुना प्रत्येकच वेळी रुग्णांची व्यवस्थित काळजी घेण्यामध्ये, त्यांना योग्य सेवा देण्यामध्ये, रुग्ण बरे होण्यासाठी ते नेहमी प्रयत्नाची पराकाष्ठा करता. नर्सिंग महाविदयालयेही अशा नर्सेसची भावी पिढी तयार करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळे त्याचे कौतुक करण्यासाठी व त्यांना विरंगुळ्याचे काही क्षण देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, डॉ. अलीमिया परकार यांच्या हस्ते करण्यात आलेल्या दिपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. ढगे, अध्यक्ष, IMA रत्नागिरी तसेच सचीव डॉ. योगेश सुर्यवंशी, खजिनदार डॉ. निकुंज भट, डॉ. तोरल शिंदे (IMA रत्नागिरीच्या मागील अध्यक्षा) इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये रत्नागिरीतील विविध रुग्णालयातील कर्मचार्यांनी आपले कलागुण दर्शवणारे कार्यक्रम सादर केले. विविध नृत्ये आणि मुकनाट्य यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यासोबतच सर्व रुग्णालयातील सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. रत्नागिरी तील सर्व हॉस्पिटल च्या मेट्रन तसेच सर्व नर्सिंग महाविद्यालयाच्या मुख्याद्यापक, मुख्याद्यापिका यांचा प्रतीकात्मक गौरव करणात आला. यावेळी विविध हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. अध्यक्षिय भाषणामध्ये बोलताना डॉ. परकार यांनी IMA च्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. अतुल ढगे यांनी सर्व मान्यवर व सहभागी कर्मचारी यांचे आभार मानले.












