जागतिकीकरणाच्या रेट्यात सर्वसामान्य माणसाला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाशी ती समरस होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जाती व्यवस्था संपविण्यासाठी धर्मांतर केले. बाबासाहेब यांचे धर्मांतर हे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय पुनर्रचना करण्यासाठी होते. समता, स्वातंत्र्य, बंधुता व सामाजिक न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी होते. त्यामुळे बौद्ध व्यतिरिक्त अनेक दलितांनीही जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी भगवान बुद्धांचा मार्ग अवलंबणे गरजेचे आहे. हा प्रमुख विचार करण्यात आला आहे. असेही ते म्हणाले.यावेळी विचारमंचावर उपस्थित भारतीय जनता मासिक संपादक प्रसेनजित, ज्येष्ठ कवी डाॅ.अनिल कांबळी यांचे हस्ते मोतीराम कटारे यांचा आबा शेवरे जीवनगौरव पुरस्कार आबा मुळीक यांचेकडे सुपूर्द करण्यात आला,तर डाॅ.कांबळी यांचे हस्ते प्रा. सिद्धार्थ तांबे यांना उत्तम-सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्यपुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम अनुक्रमे दहा हजार आणि पाच हजार असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. यावेळी पुरस्कार प्रायोजक प्रकाश तांबे, इंजि.अनिल तांबे, किशोर देऊ कदम यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कवयित्री संध्या तांबे यांनी पुरस्कार निवड समितीच्या वतीने मनोगत केले.
प्रमुख अतिथी प्रसेनजित यांनी फुले-आंबेडकरी तत्त्वज्ञानाच्या आधारे धम्म व्यवस्थेची चिकित्सा केली पाहिजे व भावी काळात नवा बौद्ध समाज आदर्श ठरेल असे वर्तन असले पाहिजे असे सांगितले. प्रा. डाॅ.राजेंद्र मुंबरकर यांनीही संस्थेच्या साहित्यिक उपक्रमाबाबत गौरवोद्गार काढले. डाॅ.अनिल कांबळी म्हणाले की, आबा शेवरे यांनी आपल्या कवितांमधून सम्यक परिवर्तनाची दिशा अधोरेखित केली. आयुष्याचे पासबुक झिरो बॅलन्स असूनसुद्धा कविता जगत राहिले. तर उत्तम पवार यांच्या सारखा उमदा कवी, कार्यकर्ता समाज वास्तवाचे विदारक चित्रण करत होता.
पुरस्काराला उत्तर देताना सिद्धार्थ तांबे यांनी आपल्या कवितेला सामाजिक आशय प्राप्त कसा झाला. आपल्यावर काव्यसंस्कार करणाऱ्या ज्येष्ठ कवींना नतमस्तक होत सूर्योन्मुख शतकांच्या दिशेने येणाऱ्या नव्या पिढीतील सृजनशील कवींनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत सहयोग द्यावा असे आवाहन केले.
संस्थेचे उपाध्यक्ष विठ्ठल कदम यांनी प्रास्ताविक केले, स्वागत आणि परिचय मधुकर मातोंडकर, पुरस्कारप्राप्त मानवंतांच्या मानपत्राचे वाचन रूपाली कदम यांनी केले तर समारोप आणि आभार संस्था कार्यवाह राजेश कदम यांनी मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सुचिता गायकवाड -कदम तर आभार प्रदर्शन संस्था सचिव व ज्येष्ठ निवेदक राजेश कदम यांनी केले.











