नारंगी नजीक मगरीच्या हल्ल्यात म्हैस ठार

 

खेड (प्रतिनिधी) खेड शहरापासून जवळच असलेल्या चिंचघर परिसरात नारंगी नदीच्या पात्रामध्ये मगरीने उच्छाद मांडला असून एका शेतक-याच्या म्हैशीवर हल्ला करून म्हैशीला ठार केले आहे.

 

गेल्या कित्येक वर्षांपासून खेड शहरालगत असणान्या चिंचघर गावाच्या परिसरात मगरींची सर्रास दर्शन होते. त्या ठिकाणी बारमाही वाहणान्या नदी असल्यामुळे आजुबाजूच्या शेतकऱ्यांची गुरे त्या ठिकाणी पाणी प्यायला जातात. आज त्या ठिकाणी नारंगी नदी पात्रातील मगरीने म्हैशीवर हल्ला केला या हल्ल्यात म्हैस ठार झाली असून त्या शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

या संदर्भात वन विभागालादेखिल कळविण्यात आले आहे. महत्त्वाचं म्हणजे नारंगी नदी पात्रात असणाऱ्या मगरी व त्यांचे प्रमाण वाढल्यास अनेक वेळा त्या गावांमध्येदेखिल शिरतात याआधी बऱ्याच वेळा गावात शिरलेल्या मगरींना रेस्क्यू ऑपरेशन करून वन विभागाच्या ताब्यात दिली आहे याच गावात भरदिवसा मगरी गावात मुक्त विहार करताना दिसतात.