खेडमध्ये वादळी पावसाचा आंबा बागायतदारांना लाखोंचा फटका

खेड (प्रतिनिधी)
गुरूवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने खाडीपट्ट्यातील आंबा  वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार  पर्जन्यवृष्टीचा आंबा बागायतदारांना मोठा फटका बसला ‘आहे. हाता-तोंडाशी आलेला घासच वळिवाच्या पावसाने हिरावून नेल्याने आंबा बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले. संपूर्ण आंबा बागायतच उद्ध्वस्त झाल्याने आंबा बागायतदारांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली असून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.
 आठवडाभरापूर्वीच पावसाने धुडगूस घालत साऱ्यांचीच दाणादाण उडवली होती. यावेळी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीतही आंबा बागायतदारांची मोठी हानी झाली होती. या पाठोपाठच दोनच दिवसापूर्वी झालेल्या वादळी पावसाचा  बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला. झाडावरील आंबे काढण्याची लगबग सुरू असतानाच वळिवाच्या पावसाने खोडा घातला. झाडावरील संपूर्ण आंबे गळून पडले असून अनेक ठिकाणीही आंब्याची झाडेही उन्मळून पडली आहेत. खाडीपट्ट्यातील आंबा बागायतदार व माजी सरपंच अकबर दुदुके यांच्या आंबा बागायतीचीही मोठी हानी झाली. आंब्याची झाडे कोसळून आंबेही गळून पडले आहेत. यामुळे लाखो रूपयांचा फटका बसला आहे. प्रशासनाने ही बाब गांभिर्याने घेवून तातडीने पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी आंबा बागायतदार दुदुके यांनी केली आहे.