- माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी स्वामींच्या पादुकांचे आगम
पादुका पूजन आरती व दर्शनाचा भक्तांनी घेतला लाभ
अक्कलकोट स्वामी समर्थांच्या चरणी भक्तगण लीन
सावंतवाडी । प्रतिनिधी : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचे सोमवारी सावंतवाडीत आगमन झाले. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या ‘जगदंब ‘ या निवासस्थानी या पादुकांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर स्वामींची आरती झाल्यानंतर भक्तांनी स्वामींच्या चरणपादुकांवर लीन होऊन दर्शनाचा लाभ घेतला.
श्री गुरुदत्तात्रेयांचे अवतार असलेल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचा भक्त परिवार मोठा आहे. स्वामींच्या दर्शनासाठी अनेक भक्तगण अक्कलकोट येथे जात असतात. मात्र,अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पादुका सावंतवाडीत येण्याचा योग जुळून आला. माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी या पादुकांचे आगमन झाले व भक्तगणांना पादुकांच्या दर्शनाचा लाभ झाला.
भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली, माजी नगरसेवक आनंद नेवगी, दिलीप भालेकर, अमित पोकळे, विनोद सावंत, बंटी पुरोहित त्यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसेच स्थानिक भक्तगणांनी स्वामींच्या चरणपादुकांचे दर्शन घेऊन प्रसाद सेवन केला. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास या पादुका माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर बाराच्या सुमारास माजी नगरसेवक सुधीर आडीवेकर यांच्या निवासस्थानी पादुकांचे प्रस्थान झाले.













