रत्नागिरी ः प्रतिनिधी
दारुच्या नशेत बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरुन येणार्या दुचाकीला धडक देत अपघात केला. याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना गुरुवार 2 एप्रिल रोजी रात्री 9.30 वा.आरटीओ ऑफीस ते कुवारबाव जाणार्या रस्त्यावरील विसपुते शाळेच्या समोर घडली होती.
अभिजित सुनिल पिलणकर (38,रा.साईनगर,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल राकेश तटकरी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार,2 एप्रिल रोजी संशयित अभिजित पिलणकर हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एजे-5137) दारुच्या नशेत चालवत घेउन आरटी ऑफीस ते कुवारबाव घेउन जात होता. त्याच सुमारास अजिंक्य कृष्णा आखाडे (रा.जागुष्टे कॉलनी कुवारबाव,रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-जे-4356) घेउन कुवारबाव ते आरटो ऑफीस असा येत होता. ही दोन्ही वाहने विसपुते शाळेच्या समोर आली असता अभिजितने समोरुन येणार्या अजिंक्यच्या दुचाकीला धडक देत अपघात केला होता. या अपघातात दोघांनाही मार लागून दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले होेते. याप्रकरणी दीड महिन्यानंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









