Arnav Shinde stands first in the district and thirteenth in the country in brain development test
सलग तीन वर्ष गोल्ड मेडलचा मानकरी
देवरुख | प्रतिनिधी : जानेवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पी एस बने इंटरनॅशनल स्कूल मधील कु.अर्णव योगेश शिंदे यांने रत्नागिरी जिल्ह्यातून प्रथम तर देशात तेरावा क्रमांक प्राप्त केला आहे. अर्णव याने 100 पैकी 97 गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे. तसेच गोल्ड मेडल चा मानकरी ठरला आहे. 9 वर्षीय अर्णवने सलग तीन वर्ष गोल्ड मेडल मिळवून स्वतःचा वेगळा रेकॉर्ड बनवला आहे.
यामुळे सर्व स्तरातून कू. अर्णव याचे कौतुक होत आहे. तसेच महाराष्ट्रीयन शिक्षण संस्थेचे सचिव व माजी आ. डॉ. सुभाष बने संचालक रोहन बने, प्राचार्य प्रदिश कलंगडन, पर्यवेक्षक सोमनाथ कुंभार यांनी कु.अर्णवला शुभेच्छा दिल्या व शाळेतील मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अर्णवला या परीक्षेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे व शिक्षिका हळबे यांचे मार्गदर्शन लाभले.











