वैभववाडी | प्रतिनिधी
तालुक्यात आज दुपारनंतर विजच्या कडकडाटसह जोरदार वादळी पाऊस झाला. त्यामुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. सध्या सगळीकडे लग्न सराई व कार्यक्रमचे दिवस असून या पावसाने या त्यामध्ये व्यत्यय आला. मात्र उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील वीज पुरवठा सायंकाळी उशिरा पर्यंत खंडित होता.
तालुक्यात गेल्या गुरुवार पासून दररोज सायंकाळी ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. दिवसा कडक उन्हाळा तर सायंकाळी पाऊस पडत आहे. वातावरणातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजल्यापासून जोरदार वादळी पाऊस झाला. वैभववाडी शहरात पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. मात्र या पावसाने नुकसान झालेची नोंद नाही. वैभववाडी शहरात रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. या चिखल पाण्यातुन नागरिकांना वाट काढण्यासाठी कसरत करावी लागत होती.












