शिरगाव( प्रतिनिधी) फेब्रुवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयचा १०० टक्के लागला.
या परिक्षेसाठी कला शाखेतून ४३ विद्यार्थी व वाणिज्य शाखेतून ९८ विद्यार्थी असे एकूण १४१ विद्यार्थी बसले होते ते सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन या प्रशालेचा १०० टक्के निकाल लागला.
कला शाखेतून साईल श्रीकृष्ण मालंडकर ६०.५० टक्के प्रथम क्रमांक, साक्षी संतोष मिठबांवकर ५८.८३ टक्के द्वितीय क्रमांक, मंजली केशव चव्हाण ५७.५० टक्के तृतीय क्रमांक मिळाला.
वाणिज्य शाखेतून सिध्दी सुभाष साबळे ८८ टक्के प्रथम क्रमांक, कशीश सुरेश घाडी ८२.६७ टक्के द्वितीय क्रमांक, लावण्या शैलेंद्र पवार ८२ टक्के तृतीय क्रमांक मिळाला.
या सर्व विद्यार्थ्यांचे शिरगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अरुण कर्ले, संस्था पदाधिकारी व संचालक, प्राचार्य एस.एन.अत्तार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे,सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.











