लायन्स क्लब ऑफ चिपळूण अध्यक्षपदी जगदीश वाघुळदे यांची निवड

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण येथील वनश्री हॉटेलमध्ये लायन्स क्लब ऑफ चिपळूण अध्यक्ष ला.नहुष चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नॉमिनेशन कमिटी अध्यक्ष एम.जे.एफ. ला.नितीन गांधी सदस्य एमजेएफ ला.डॉ विजय रीळकर व ला.तुषार गोखले यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मिटींगमध्ये सर्वांनुमते २०२४-२५ वर्षाकरिता नवीन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. निवड समितीने यावेळी संजीवनी प्रशिक्षण संस्थेचे संचालित संजीवनी डिएमएलटी नर्सिग कॅालेजचे चेअरमन जगदीश वाघुळदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

२०२४-२५ साठी नुतन अध्यक्ष एम जे एफ ला .जगदीश वाघुळदे, सचिव ला. राजीव कांबळे, खजिनदार ला.अरुण कदम, उपाध्यक्ष ला. शिरीष मुळे, सहसचिव ला. मिलिंद मुद्राळे सहखजिनदार ला.दिनेश धारिया, डायरेक्टर ला. डॉ. विजय रिळकर, ला. विजय ओसवाल, ला. डॉ. अशोक केतकर, ला. दिलीप जैन, ला अजय भालेकर, ला. रमेश रेळेकर, ला. भरत रेडीज, ला. तुषार गोखले, क्लब ॲडमिनिस्ट्रेटर ला. श्रीनिवास परांजपे, क्लब अँडव्हायझर ला. अनिल देसाई, लिओ क्लब अँडव्हायझर ला. अमर शेट्ये, एलसीआयएफ क्लब कोऑर्डीनेटर ला. नितिन गांधी, जी एल टी कोऑर्डीनेटर ला. विजय रतावा, जीएमटी कोऑर्डीनेटर ला. नंदकुमार चिटनिस, जीएसटी कोऑर्डीनेटर राजन इंदुलकर, बुलेटिन चेअरमन ला. चंद्रकांत मांडवकर, टेमर ला. राजकुमार जैन, टेल व्टिस्टर ला. शांतीलाल गांधी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच पुढील वर्षांमध्ये जोमाने लायन्स क्लब चिपळूणचे सेवा कार्य चालू राहील याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष एमजेएफ ला.जगदीश वाघुळदे यांनी दिली व नवीन कार्यकारीणीचे अभिनंदन केले.

सभेसाठी उपस्थित अध्यक्ष ला. नहुष चितळे, सचिव ला. नंदकुमार चिटणीस सह सर्व बहूसंख्य लायन सदस्य उपस्थित होते. या सर्व लायन्स नी नुतन अध्यक्ष यांना शुभेच्छा दिल्या.