बागवे हायस्कुल येथे वॉटर प्युरीफायरचे उदघाटन!

Google search engine
Google search engine

Inauguration of Water Purifier at Bagway High School!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबईचे सचिव नारायण सावंत यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून आर. पी. बागवे हायस्कूल व एम. जी. बागवे तांत्रिक विद्यालय मसुरे येथे देणगी स्वरुपात वॉटर प्युरिफायर युनिट भेट दिला. उद्घाटन संस्था सभासद श्री सुधीर परब यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मुंबई कमिटी उपाध्यक्ष श्री. उत्तम राणे, श्री. राजन परब, शाळा समिती अध्यक्ष सरोज परब , लोकल कमिटी सदस्य श्री. आप्पा परब, मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे , भरतगड हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एस. आर. कांबळे, राणे इंग्लिश स्पिकिंग कोर्सचे संचालक श्री. राणे सर, श्री. ओंकार परब, श्री. एस. बी. चौगले. श्री. आर. एल. पाताडे, श्रीम. एस.एस. मसुरेकर, श्री. एस. एस. हळवे, श्रीम. ए. ए. भोगले, श्रीम. व्ही. एस. जाधव, श्री. एस. एम. नाईक, श्री. एस. व्ही. पिंगुळकर, श्री. एन. एस. जाधव, श्री. एस. डी. बांदेकर, श्री. के. जी. घाटे, श्री. बी. एस. ठाकूर, श्री. डी. पी. पेडणेकर, श्री. बी. जी. परब, श्री. बी. व्ही. मेस्त्री व श्री. सी. ए. फुकट आदी उपस्थित होते.