माखजन परिसरात वादळाने आंबा काजूंसह अन्य झाडांचे नुकसान

माखजन |वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील माखजन सह आरवली दशक्रोशीत गेले ५ दिवस होणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे आंबा,काजूच्या पिकासह झाडांचे व अन्य नगदी झाडांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा पिक जमिनीवर झोडपून पडलेच.पण सोबतच आंबा काजूच्या फ़ांद्या तुटल्याने बागायतदारांचे मोठे नुजशन झाले आहे.शिवाय अन्य नगदी झाडें मोडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सतत होत् असलेल्या वादळामुळे झाडें मोडण्याचे प्रमाण वाढल्याने बागायतदार व शेतकरी हतबल झाला आहे.