कालावल खाडी किनारी विविध ठिकाणी असलेले 30 अनधिकृत वाळू रॅम्प जमिनदोस्त
मालवण | प्रतिनिधी : अनधिकृत वाळू उत्खनन प्रकरणी मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. कर्ली खाडी किनारी पहिल्या दिवशी कारवाई केल्या नंतर दुसऱ्या दिवशी कालावल किनारी कारवाई करत 30 वाळू उतखनन रॅम्प जमिनदोस्त केले आहेत.
वायंगणी सडयेवाडी दोन रॅम्प, मधली तोंडवळी बारा रॅम्प, वरची तोंडवळी सूरूबन नजीक आठ रॅम्प, वरची तोंडवळी तीन रॅम्प, भगवंतगड पाच रॅम्प असे एकूण 30 अनधिकृत वाळू रॅम्प महसूल पथकाने जमिनदोस्त केले.
मालवण तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनखाली महसूल व पोलीस पथकाने ही कारवाई केली.











