माखजन कासे मार्गांवर अपूर्ण मोरी मुळे रस्त्याची दुरवस्था

माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन कासे मार्गांवर मुख्य पुलाच्या अलीकडे गतवर्षी मोरीचे काम करण्यात आले.परंतु या मोरीचे काम अद्याप अपूर्ण असल्याने रस्त्यावर खाडदेव चिखल पसरला आहे.शिवाय पाणी साचत आहे.
या मोरीचे काम पूर्ण झाल्यावर तात्काळ डांबरीकरण करणे गरजेचे होते.परंतु हे काम पूर्ण न केल्याने येथून प्रवास करणाऱ्या लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.माखजन व गडनदी पलीकडील कासे,कळंबुशी,असावे,पेढांबे,नारडूवे,शिरंबे गावातील रहिवाशांना याचा रोजचा त्रास सहन करावा लागत आहे.सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे सगळा रस्ता चिखलमय झाला असून खड्ड्यांमुळे पाणी साचले आहे.
या मोरीवरचे डांबरीकरण तात्काळ करून येथील अडचण दूर करावी अशी मागणी करण्यात आली आहे.