मांडवी एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल

खेड(प्रतिनिधी)
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट विस्तारीकरण्याच्या. कामासाठी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे कोकण मार्गावरून धावणारी मडगाव- सीएसएमटी मुंबई मांडवी एक्सप्रेस पनवेल स्थानकापर्यंत धावत आहे. या पाठोपाठ एक्सप्रेस सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने  जाहीर केले. १०१०४ क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी मुंबई मांडवी एक्सप्रेस बुधवारपासून २ जूनपर्यंत १ तास १५ मिनिटे उशिराने धावणार आहे. या कालावधीत एक्सप्रेस मडगाव स्थानकातून सकाळी ९.१५ सुटण्याऐवजी सकाळी १०.३० वाजता सुटेल. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.