भाजपाच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हा सरचिटणीसपदी चंद्रकांत मांडवकर यांची निवड 

लांजा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना जिल्हा कमिटीत स्थान 

लांजा (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीच्या नव्याने जाहिर झालेल्या रत्नागिरी दक्षिण जिल्हा कार्यकारिणीमध्ये माजी लांजा तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपाच्या दक्षिण जिल्हा कार्यकारिणीत तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी लांजाचे कणखर नेतृत्व, सगळ्यांना समाविष्ट करून घेणारे, शांत स्वभावाचे माजी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली आहे.‌ तसेच माजी तालुकाध्यक्ष विजय कुरूप यांची-विशेष निमंत्रित सदस्य, संजय यादव-जिल्हा उपाध्यक्ष, हेमंत शेट्ये -जिल्हा चिटणीस, श्रीकृष्ण उर्फ बब्या हेगीस्टे -जिल्हा कार्यकारणी सदस्य, चंद्रकांत( दादा) खामकर-जिल्हा कार्यकारणी सदस्य, प्रमोद कुरूप-जिल्हा कार्यकारणी सदस्य, महेंद्र शेडे-जिल्हा कार्यकारणी सदस्य, शेखर सावंत-जिल्हा कार्यकारणी सदस्य, नरेश राणे-जिल्हा कार्यकारणी सदस्य, विद्याधर राणे-जिल्हा कार्यकारी सदस्य ,वाघोजी खानविलकर, प्रभाकर टोळे यांची देखील कार्यकारी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.