लांजा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या लांजा शहराध्यक्षपदी शरीफ नाईक यांची निवड करण्यात आली आहे.
शरीफ नाईक हे राष्ट्रवादीचे जुने जाणते कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. नुकतीच त्यांची लांजा शहराध्यक्षपदी एकमुखी निवड करण्यात आली. त्यावेळी त्यांचे पक्ष निरीक्षक बबन कनावजे, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, जेष्ठ नेते महंमद रखांगी, तालुकाध्यक्ष बापु जाधव, महिला तालुकाध्यक्षा सौ. वैष्णवी बाईंग, महिलाजिल्हाध्यक्षा सौ. शमाताई थोडगे,श्रीमती उर्मिला बाईंग, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष संजय कांबळे, जिल्हाउपध्यक्ष अनंत आयरे,.सहदेव लांजेकर आदी उपस्थित होते.
यावेळी पक्ष निरीक्षक बबन कनावजे व उपस्थित पदाधिकारी यांनी शरीफ नाईक यांचे स्वागत केले.












