लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील भांबेड येथील प्रतापराव माने विद्यालय भांबेड या प्रशालेचा इयत्ता दहावी शालांत परीक्षेचा एकूण निकाल ९६.६६% लागला आहे.
या निकालात सेमी इंग्रजी १००% आणि मराठी तुकडी चा ९३.९३% लागला आहे. यामध्ये सेमी इंग्रजी तुकडी मध्ये प्रथम क्रमांक प्रणव श्रीपत इंदुलकर ९२.८०% द्वितीय सिद्धी विजय गुरव ८९.२०% तृतीय ईशा दिनेश भालेकर ८७.४०%मराठी मिडीयम तुकडी मध्ये प्रथम श्रवण संतोष मोरे ७२.६०% द्वितीय सोनाली शामसुंदर गुरव ६८.६०% गीतांजली मनोहर गुरव ६५.२०% असे गुणांकन प्राप्त केले आहेत.
गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष ॲड. सदानंद गांगण, उपाध्यक्ष गणेश साळुंके, सचिव संदीप जाधव, खजिनदार अविनाश गुरव, शाळा समिती अध्यक्ष गोपीनाथ पवार, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक आय. सी. मुलानी यांनी अभिनंदन केले आहे.











