जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या लांजा तालुका अध्यक्षपदी योगेश पांचाळ 

लांजा( प्रतिनिधी) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या लांजा तालुका अध्यक्षपदी योगेश पांचाळ यांची फेरनिवड करण्यात आली आहे

गेल्या अनेक वर्षांपासून रायगड, ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था कार्यरत आहे.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल सुरु आहे.

संस्थेच्या मार्फत गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम आणि सुविधा पुरविण्यात येत आहेत

लांजा येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे कार्यालय सुरू करण्यात आल्यानंतर या संस्थेच्या लांजा तालुका अध्यक्ष पदाची धुरा संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी लांजाचे सुपुत्र योगेश पांचाळ यांच्यावर सोपविली होती. त्यानंतर योगेश पांचाळ यांनी संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी दिलेली जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.

त्याचीच दखल घेत अध्यक्ष निलेश सांबरे यांनी पुन्हा एकदा योगेश पांचाळ यांच्यावर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या लांजा तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे. हे अध्यक्ष पद एका वर्षासाठी देण्यात आले असून आपल्या संघटनेचे कार्य प्रभावीपणे राबवावे. सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे आणि नवीन कार्यकर्त्यांचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा निलेश सांबरे यांनी नियुक्ती पत्राद्वारे व्यक्त केली आहे. एका वर्षासाठी नियुक्ती असली तरी आपण दिलेल्या योगदानानुसार पदाची पुनर्नियुक्ती होईल असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या लांजा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल योगेश पांचाळ यांच्यावर तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.