रत्नागिरी :
राज्य माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी जाहीर करण्यात आला. यामध्ये बारावी पाठोपाठ दहावीच्या परिक्षेतही कोकण बोर्डाने सलग 13 व्या वर्षी अव्वल ठरण्याचा मान मिळवला आहे. यंदा दहावी परीक्षेत कोकण बोर्डाचा निकाल 99.01 टक्के इतका लागला आहे अशी माहिती कोकण बोर्डाच्या प्रभारी विभागीय सचिव तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. कोकण विभागाचा 2021 या गेल्या दहाव्या वर्षात महाराष्ट्रात सर्वाधिक 100 टक्के निकाल लागला होता.
यावर्षी 2024 मध्ये दहावी परिक्षेसाठी कोकण बोर्डातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हय़ातून एकूण 26,836 विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी 26,780 विद्यार्थी या परिक्षेसाठी प्रविष्ठ झालेले होते. मुल्यमापन केलेले 26,517 विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण झालेले आहे. हे प्रमाण 98.66 टक्के इतके आहे. त्यामध्ये 13 हजार 551 मुलांचा तर 12 हजार 966 मुलींचा समावेश आहे. हे प्रमाण 99.39 टक्के इतके आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ात या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 17 हजार 786 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ाचा निकाल 98.85 टक्के लागला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात उत्तीर्ण झालेल्या 8 हजार 731 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या जिल्हय़ा निकाल 99.35 टक्के इतकला लागला आहे.
रत्नागिरी जिल्हय़ात 9 हजार 159 मुले या परिक्षेला प्रविष्ठ झालेले होते. त्यापैकी 9 हजार 16 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. ही टक्केवारी 98.43 टक्के इतकी आहे. तर 8 हजार 833 मुली परिक्षेला प्रविष्ठ होत्या, त्यापैकी 8 हसजार 770 मुली उत्तीर्ण झलेल्या आहेत. हि टक्केवारी 99.28 टक्के इतकी आहे. तर सिंधुदूर्ग जिल्ह्य़ात 4 हजार 576 मुलगे प्रविष्ठ होते त्यापैकी या परिक्षेत 4 हजार 535 उत्तीर्ण झाले आहेत. हि टक्केवारी 99.10 इतकी आहे. तर 4 हजार 212 मुली प्रविष्ठ होत्या त्यापैकी 4 हजार 196 मुली या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या आहेत. हि टक्केवारी 99.62 टक्के इतकी आहे.
या परिक्षेचा निकाल मार्च 2023 या वर्षाचा निकाल 98.11 टक्के, तर यावर्षी 2024 चा निकाल 99.01 टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षीच्या निकालात 0.9 टक्के इतकी वाढ झाली आहे. तसेच पुर्नपरिक्षार्थी विद्यार्थी निकाल 68.37 टक्के लागलेला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून प्रविष्ठ झालेले 196 विद्यार्थ्यापैकी 128 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून प्रविष्ठ झालेले 57 पैकी 45 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत.











