माखजन |वार्ताहर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात घेण्यात आलेल्या रत्नागिरी – सिंधुदुर्ग स्तरीय सवेष साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धेत रत्नागिरी ची सार्था नरेंद्र गवाणकर हिने प्रथम क्रमांक पटकवला.
सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेण्यात आली होती.ही स्पर्धा आजगाव च्या श्री वेतोबा मंदिरात झाली.
सार्था ने सवेष ,साभिनय सादरीकरण करताना आपल्या गोड गळ्याने व बहारदार सादरीकारणाने उपस्थितांसह परीक्षकांवर मोहिनी घातली.तीने भूमिकन्या सीता नाटकातील ‘मी पुन्हा वनांतरी’हे नाट्य पद सादर् केले. ह्या स्पर्धेच्या परीक्षणासाठी ख्यातनाम शास्त्रीय गायिका विदुषी श्रुती सडोलीकर उपस्थित होत्या. सार्था ने सवेष साभिनय नाट्यगीत सदर करताना ८ ते १६ वयोगटात राधाकृष्ण चषक पटकावत प्रथम् क्रमांक मिळवला.तिला ३ हजार १ व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
सार्था शास्त्रीय गायन स्पर्धेत १४ ते ४० वयोगटात आपली चुणूक दाखवत १७ मिनिटे मालकंस राग आळवला.तीने तृतीय क्रमांक मिळवला.तिला २ हजार ५०१रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.सार्था ही रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूल ची विद्यार्थिनी असून ती प्रख्यात गायिका सौ मुग्धा भट सामंत यांच्याकडे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायानाचे धडे घेत आहे.
सार्थाच्या आवाजातील गोडवा,सफाईदार ताना,अल्प वयामध्ये असलेली संगीताची समज यामुळे जिल्ह्यात तिच्या कडे उदयोन्मुख गायिका म्हणून पाहिले जात आहे.सिंधुदुर्गात मिळवलेल्या तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.












